वॉलमार्टने भारतात वाटली लक्षावधी डॉलर्सची लाच

wallmart
वॉशिंग्टन- भारतात अब्जावधी डॉलर्सची लाच अमेरिकेतील बहुराष्ट्रीय रिटेल कंपनी वॉलमार्टने दिल्याचा संशय व्यक्त होत असल्याचे द वॉल स्ट्रीट जर्नल या दैनिकाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार ३०० रुपयांपासून १३ हजार रुपयांपर्यंत लाच वाटण्यात आली आहे.

भारतात अनेक स्तरावरील अधिका-यांना छोटय़ा छोटय़ा रक्कमेच्या स्वरूपात वॉलमार्टने मोठय़ा प्रमाणात लाच दिल्याचा संशय आहे. सीमाशुल्क विभागाच्या ताब्यातील माल सोडवण्यासाठी आणि बांधकामासंबंधी परवानगी मिळवण्यासाठी ही लाच दिली गेली. २०० डॉलर्सपासून पाच डॉलर्सपर्यंत लाचेचे वाटप करण्यात आले. ही सर्व रक्कम लक्षावधी डॉलर्सच्या घरात जाते, असे वर्तमानपत्राने सांगितले.

भारतात कंपनीने लाच दिल्याचे अनेक पुरावे अमेरिकेच्या तपास यंत्रणांना मिळाले आहेत. ही तपास यंत्रणा तीन वर्षे या प्रकरणाचा तपास करीत होती. ही लाच छोटय़ा छोटय़ा अधिका-यांना वाटण्यात आली.

Leave a Comment