तिकीटाच्या आकाराची पृथ्वी चिप विणेल इंटरनेटचे जाळे

saankhya
बंगलोर – येथील सांख्य लॅबने विकसित केलेली पृथ्वी नावाची बोटाच्या पेरावर मावेल इतकी छोटी चीप भारताच्या ग्रामीण भागात इंटरनेटचे जाळे विणू शकेल असा दावा सीईओ व सहसंस्थापक पराग नाईक यांनी केला आहे. ते म्हणाले आमचे हे तंत्रज्ञान यशस्वी ठरले तर इंटरनेट डॉट ओआरजीची आवश्यकताच संपुष्टात येणार आहे. गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट ग्रामीण भारतात इंटरनेट सेवा देण्यासाठी अनेक कार्यक्रम हाती घेत आहेत मात्र ही पोस्टाच्या तिकीटाच्या आकाराची चीप स्वस्तात, खात्रीशीर इंटरनेट देऊ शकेल.

नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार या चीपमुळे एक सिस्टीम रन करता येते.त्यामुळे टीव्हीच्या व्हाईट स्पेस अथवा वाया जाणार्‍या स्पेक्ट्रम बँड विड्थचा वापर करून घराघरात इंटरनेट सेवा देता येते. जगभरात या स्पेक्ट्रमचा वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात भारत या चिपमुळे अग्रणी बनू शकतो. पृथ्वी चिपसाठी मेघदूत नावाची सिस्टीम डेव्हलप केली गेली आहे ती टीव्ही वाहिन्यांच्या व्हाईट स्पेसचा वापर करून दुर्गम भागात वायरलेस ब्रॉडबँड पोहोचवू शकते. या प्रॉडक्टमध्ये १ बेस स्टेशन व युजरसाईड मोडेम आहे.

सांख्य लॅब लवकरच आयआयटी पवई, दिल्ली,हैद्राबाद यांच्या मदतीने या सिस्टीमच्या चाचण्या देशभर सुरू करणार आहे.या चाचण्या यशस्वी झाल्या तर त्याचा वापर अन्य देशांतही करता येणार आहे आणि त्यासाठी फिलिपिन्स, यूएस व सिंगापूर येथेही ट्रायल घेतल्या जाणार आहेत.

Leave a Comment