ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी महिंद्रा अॅन्ड महिंद्राने त्यांच्या कृषी विभाग व्यवसायाखाली नुप्रो ब्रँड स्थापन केला असून या नावाने ब्रँडेड डाळींची विक्री मुंबईत सुरू केली आहे. सध्या या ब्रँडनेमखाली तूरडाळ विकली जात असून लवकरच सर्व प्रकारच्या डाळी आणि बेसनही विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे कार्यकारी अधिकारी पवन गोयंका यांनी सांगितले.
महिंद्रा अॅन्ड महिंद्रा नुप्रो बँडखाली विकणार डाळी
गोयंका म्हणाले सध्या आम्ही फक्त मुंबईतच विक्री सुरू केली आहे मात्र लवकरच पुणे आणि नाशिक येथेही आमच्या ब्रँडेड डाळी विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यानंतर देशभरातील सर्व प्रमुख बाजारात त्या उपलब्ध होतील. आमच्या कृषी क्षेत्र समृद्धीसाठी कृषी व्यवसायात आम्ही दीर्घ काळ प्रयत्न करतो आहोत आणि आमच्या आकाक्षा नुप्रो ब्रँडमुळे पूर्ण होतील असा विश्वास आहे. आमचा हा ब्रँड प्रिमियम ब्रँड म्हणून देशात प्रस्थापित होईल यात कांहीही शंका नाही.