इस्त्रो लॉन्च करणार सिंगापूरचे ६ सॅटेलाईट्स

isro
नवी दिल्ली : डिसेंबरमध्ये सिंगापूरचे ६ सॅटेलाईट्स भारताची अंतराळ संस्था इस्त्रो एकत्र लॉन्च करणार आहे. याआधी अमेरिका, कॅनडा आणि इंडोनिशिया या देशांनी एकत्र ६ सॅटेलाईट एस्ट्रोसॅटसह एकच रॉकेट लॉन्च केले होते. लहान-मोठ्या जवळपास दीड हजार सॅटेलाईट्स येत्या १० वर्षांत लॉन्च करण्याची इस्त्रोची योजना आहे.

पीएसएलव्हीमार्फत सिंगापूरचे सर्व सॅटेलाईट्स सोडले जाणार आहेत. भारताचे सर्वात महत्त्वाचे रॉकेट म्हणून पीएसएलव्ही ओळखले जाते. सिंगापूरच्या ६ सॅटेलाईट्समधील ५ सॅटेलाईट्स सिंगापूर यूनिव्हर्सिटीचे मिनी-सॅटेलाईट्स आहेत. तर सहावे सॅटेलाईट पृथ्वीवर नजर ठेवणार सॅटेलाईट असून त्याचे वजन ५०० किलो एवढे असेल.