मुंबई: फेरारीच्या ६.५ कोटीची कारपेक्षाही जास्त किंमत मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटवर कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोनची किंमत पाहायला मिळाली असून मायक्रोसॉफ्टच्या बजेट स्मार्टफोन लुमिया ५२०ची किंमत कंपनीच्या वेबसाइटवर ऑफरसह ८ मिलियन डॉलर लिहिली गेली.
मायक्रोसॉफ्टच्या लुमिया ५२०ची किंमत ८ मिलियन
मायक्रोसॉफ्टचा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असून ज्याची खरी किंमत १४० डॉलर म्हणजेच ९०६७ रुपये एवढी आहे. या एप्रिल २०१३मध्ये लॉन्च केलेल्या ५१२एमबी रॅम असलेला हा स्मार्टफोन ज्यात ५ मेगापिक्सेल कॅमेरा आणि १,४३०mAhची बॅटरी आहे.
पण सत्य काय आहे ते जरा जाणून घ्या आपण कंपनीच्या वेबसाईटवर स्मार्टफोन समोरील बाय लिंकवर क्लिक करताच वॉलमार्टची वेबसाइट उघडली जाते आणि तिथे या फोनची खरी किंमत दिसते. कंपनीने चुकीने स्मार्टफोनची किंमत ८ मिलियन लिहिली गेली होती जी चुक आता कंपनीने दुरुस्त केली आहे.