इबोलाचा लैंगिक संबंधाद्वारेही प्रसार

ebola
न्यूयॉर्क : आफ्रिकेत दहशत असलेला आजार म्हणजे इबोला. लैगिक संबंधांद्वारेही या इबोलाचा प्रसार होत असल्याचे आता एका संशोधनाद्वारे समोर आले आहे. इबोलापासून बचावलेल्या एका व्यक्तीचा संबंध एका महिलेशी आला. या महिलेच्या शरीरातही इबोलाचे विषाणू लैंगिक संबंधाद्वारे गेल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे जगभरात दहशत पसरवणा-या या आजाराचा नेमका प्रसार कसा होत आहे यावर नवा प्रकाश पडला आहे. अमेरिकन लष्कराच्या वैज्ञानिकांनी आणि लिबिरियन इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल सायन्स यांनी संशोधन करून याबाबतचे सज्जड पुरावे दिले आहेत. इबोलाची नेमकी लागण कधी झाली आणि ते प्रथम कधी निदर्शनास येते याचाही नेमका काळ यामुळे समोर आला आहे. मार्च २०१५ मध्ये या महिलेला इबोलाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. वैज्ञानिक जगतात या संशोधनाद्वारे अनेक नव्या गोष्टींवर प्रकाश टाकता येणार आहे. या महिलेचे ऑक्टोबर २०१४ मध्ये या व्यक्तीशी लैंगिक संबंध आले होते. मात्र त्यांना त्यावेळी इबोला झाला नसल्याचे चाचण्यांमध्ये दिसले. नंतर मात्र या महिलेला इबोलाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. २७ मार्चला या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या संबंध आलेल्या पुरुषाच्या विर्याचे आणि रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यात या दोन्ही माध्यमातून इबोलाची लागण होत असल्याचे स्पष्ट झाले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment