अंतराळ संशोधनात स्वीटी पाटेची झेप

sweety-pate

रॉकेट विकसित करणारी पहिली महिला

नवी दिल्ली : कल्पना चावला आणि सुनीता विल्यम या महिलांनी अंतराळ क्षेत्रात मोलाची कामगिरी केल्यानंतर आता त्यात भर पडली आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावच्या स्वीटी पाटे या तरुणीची. अंतराळ संशोधकांच्या रांगेत चाळीसगावची स्वीटी पाटे ही जगातील एकमेव महिला ठरली आहे. स्टड्ढॅटोस – २ प्लस या रॉकेट संशोधनात तिने मोलाचा वाटा उचलला आहे. स्वीटी पाटे हिच्या या संशोधनकार्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

यूरोपियन विद्यापीठाच्या एअरोस्पेस अभियंत्रिकी विद्यार्थ्यांच्या ४० जणांच्या टीमने हे रॉकेट विकसित केले असून त्यात स्वीटी ही एकमेव महिला होती. हे रॉकेट स्पेनच्या स्पॅनिश स्पेस एजन्सीतून शुक्रवारी रात्री ८ वाजता यशस्वीपणे अवकाशात झेपावले असून त्याची नोंद जगभराने घेतली आहे. या यशस्वी प्रयोगामुळे स्वीटीने जागतिक विक्रमाची नोंद केली आहे.

स्टड्ढॅटोस २ प्लस हे रॉकेट ५० किमी उंचीपर्यंत उड्डाण करणारे आहे. मुख्य म्हणजे हे रॉकेट लॉंच केल्यानंतर ते पुन्हा मिळवता येते. तांत्रिकदृष्ट्या जगातील हे सर्वांत प्रगत रॉकेट आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात तिचे बालपण गेले. लहाणपणापासून तिला विमानाची आवड होती; पण विमानात बसण्यासाठी किती पैसे लागतात? हे गणित करीत न बसता तिने त्याचे स्वप्न केले. शाळेत तिला गणित आणि विज्ञानाची आवड होती त्यामुळे तिला तिच्या आई-वडिलांनी प्रोत्साहन देण्यासाठी राजस्थानच्या कोटा शहरात शिकायला पाठविले. तिथून तिने बीटेक करण्यासाठी चेन्नई गाठले. तिथे विशेष प्राविण्यासह एअरोस्पेस इंजिनिअरींगची पदवी मिळविली तेथूनच तिचे संशोधन सुरू झाले. फ्रान्सची राजधानी असणा-या पॅरिस येथे आयोजित आंतरराष्ट्रीय एरोस्पेस अ‍ॅण्ड मॅकॅनिकल परिषदेत अ‍ॅडव्हॉन्स एअरक्राप्ट डिझाईन आणि अ‍ॅडव्हान्स लॉन्चिग मेकॅनिझम हे दोन संशोधन निबंध तिने सादर केले त्या वेळी ती अवघ्या १९ वर्षांची होती. तिच्या या संशोधनामुळे वयाच्या विसाव्या वर्षी पहिली युवा शास्त्रज्ञ हा सन्मान तिला मिळाला तसेच नासा ग्रीन एव्हिएशन २०११ उपक्रमात प्रदूषण विरहीत, कमी धावपट्टी लागणा-या आणि कमी आवाज असणा-या तिच्या डॉल्फिन विमानाच्या डिझाईनला उपक्रमात जगात तिसरा क्रमांक मिळाला होता. नासाने स्वीटी पाटेचे मोठे कौतूक केले जागतिक कॉन्फरन्समध्ये तिला आमंत्रित केले होते.

Leave a Comment