झोपोचा फोरजी सेव्हन प्लस लाँच

zopo
चीनी स्मार्टफोन कंपनी झोपो ने त्यांचा फोरजी सेव्हन प्लस स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याची किंमत १४९९९ रूपये असून तो अॅमेझॉनवर सध्या उपलब्ध करून दिला गेला आहे.२२ आक्टोबरपासून तो ऑफलाईन रिटेल शॉपमध्येही ग्राहकांना मिळू शकणार आहे.

या फोनसाठी ३ जीबी रॅम, ५.५ इंची आयपीएस फुल एचडी स्क्रीन, अँड्राईड लॉलिपॉप ५.१, १६ जीबी मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ६४ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, १३.२ एमपीचा ऑटोफोकस रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह तर सेल्फीसाठी ५ एम.पीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. कनेक्टीव्हीटीसाठी फोरजी बरोबरच थ्रीजी, जीपीआरएस, एज, ब्ल्यू टूथ, वायफाय अशी ऑप्शन्स आहेत. फोनचे वजन आहे १४९ ग्रॅम.

Leave a Comment