इंटेक्सने आणला सामान्यांना परवडणारा स्मार्टफोन

intex
नवी दिल्ली- भारतीय मोबाईल कंपनी इंटेक्सने भारतात सामान्यांना परवडणारा असा स्मार्टफोन लॉन्च केला असून या स्मार्टफोनचे नाव ‘इंटेक्स क्लाऊड स्वीफ्ट’ असे आहे. शुक्रवारपासून हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साईट स्नॅपडिलवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत ८,८८८ रुपये आहे.

मंगळवारपासून रिटेल शॉपमध्ये ‘इंटेक्स क्लाऊड स्वीफ्ट’ हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. दोन रंगामध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे कमी किंमतीत कंपनीने तीन जीबी रॅम दिला आहे.

हा स्मार्टफोन खरेदी करणा-या ग्राहकांना कंपनीने स्क्रीन वॉरंटीदेखील दिली आहे. हा स्मार्टफोन डयुअल सीम आहे.

इंटेक्स ‘क्लाऊड स्वीफ्ट’ चे काही फिचर्स
» पाच इंच डिस्प्ले » १६ जीबी इंटरनल मेमरी » १ गिगाहर्टझ क्वाडकोर मिडियाटेक प्रोसेसर » तीन जीबी रॅम » आठ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा » पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप » २५०० एमएएच बॅटरी » ७२०x१२८० पिक्सेल रिझुलेशन

Leave a Comment