अंतराळ उत्पादन संबंधी कंपन्यांत वाढतेय गुंतवणूक

invest
मंगळावर पाणी सापडल्याचे पुरावे मिळाल्यापासून अचानक गुंतवणूकदार, धनाढ्य व्यक्तींबरोबर सर्वसामान्यांचा ही अंतराळातील रस अचानक वाढला असल्याचे दिसून येत असून गेल्या कांही महिन्यात अंतराळसंबंधी उत्पादने करणार्‍या कंपन्यांतून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात असल्याचे दिसून आले आहे. ही गुंतवणूक प्राधान्याने अंतराळ मिशन आखणार्‍या कंपन्या, छोटे सॅटेलाईट, स्वस्त रॉकेट अशा वस्तू बनविणार्‍या कंपन्यातून केली जात आहे.

आजपर्यंत अंतराळ संदर्भातील साहित्य आणि संशोधन प्रामुख्याने नासा आणि रशियाच्या रोसकॉसमॉस या दोन संस्थांपुरते मर्यादित होते. मात्र आर्थिक मंदीच्या काळात या संस्थांना दिल्या जात असलेल्या अनुदानत कपात झाली आहे. त्याचा फायदा खासगी कंपन्यांनी उठविला आहे. आणि त्यात उद्योजक, व्हेंचर कॅपिटॅलिस्ट, धनाढ्य, व्यक्तीगत पातळीवर भागीदारी करण्यास पुढे आले आहेत. अंतराळ यात्रा अजून दूरचा पल्ला असला तरी स्वस्त रॉकेट बनविणार्‍या कंपन्या, छोटे सॅटेलाईट उत्पादक यातील गुंतवणूक वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या स्पेस इंडस्ट्रीमध्ये २०११ साली १०० कंपन्या होत्या त्यांची संख्या आता १ हजारांवर गेली आहे. त्यातील ७०० कंपन्या खासगी आहेत आणि त्यात अब्जावधींची गुंतवणूक झाली आहे. मार्सवन मिशन मध्येही मोठी गुंतवणूक झाली आहे. गुगल एअरबस सारख्या बड्या कंपन्याही या गुंतवणूकीत मागे नाहीत. येत्या पाच वर्षात या क्षेत्रातील लिस्टेड कंपन्यांची संख्या वाढेल आणि त्या आयपीओ बाजारात आणतील असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment