रेल्वे प्रवाशांना वेटिंगचे टेन्शन नाही; १ नोव्हेंबरपासून मिळणार सुविधा

railway-ticket
नवी दिल्ली : सणासुदींचे दिवस आता सुरू झाले असून रेल्वेने प्रवास करणा-यांची कन्फर्म तिकीटसाठी लगबग सुरू झाली आहे. तात्काळ आणि प्रीमियम तत्काळमध्येही तिकीट मिळणे कठीण झाले आहे. अशात भारतीय रेल्वेकडून सर्व प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. नव्या व्यवस्थेअंतर्गत जर आपण तिकीट काढलेल्या रेल्वेगाडीचे कन्फर्म तिकीट मिळाले नाही. तर प्रवाशाला त्याच मार्गावरून जाणा-या दुस-या ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळणार आहे. १ नोव्हेंबरपासून ऑॅल्टर्नेटिव्ह ट्रेन्स अकोमोडेशन स्कीमच्या नावाने ही सुविधा सुरू होणार आहे.

पर्यायी ट्रेनचे नाव नव्या बुकिंग नियमांतर्गत देण्याची सुविधा देण्यात येईल. या सुविधेमुळे तिकीट बुक करतांना आपण ज्या कॅटॅगिरीत बुक करतोय त्याच कॅटेगिरीमध्ये पर्यायी ट्रेन्सची नावे देऊ शकता. जर आपले तिकीट कन्फर्म झाले नाही तर पर्यायी ट्रेनमध्ये शिफ्ट केले जाईल. यात बोर्डिंग स्टेशनची वेगळी निवड करण्याचेही ऑॅप्शन असेल. या नियमांतर्गत रेल्वे स्पेशल ट्रेन्समध्येही लोकांचे तिकीट कन्फर्म करेल. यासाठी वेगळे अधिक पैसे मागितले जाणार नाहीत. एका प्रकारच्या मेल आणि एक्सप्रेस ट्रेन्समध्ये हा नियम एकत्र लागू केला जाईल. मात्र बोर्डिंग स्टेशन बदलल्यास अधिकची रक्कम परत मिळणार नाही.

Leave a Comment