कॉल ड्रॉपसाठी ग्राहकांना एक रुपया द्या – ट्राय

call-drop
नवी दिल्ली- दूरसंचार नियामक प्राधिकरणाने म्हणजेच ट्रायने कॉल ड्रॉपसाठी ग्राहकांना एक रुपया द्यावा असा आदेश दूरसंचार कंपन्याना दिला आहे. मात्र हा आदेश देतानाच त्यासाठी दिवसभरात जास्तीत जास्त तीन कॉल ड्रॉपसाठी हा निर्णय लागू राहणार आहे.

लवकरच यासंदर्भातील आदेश ट्राय जारी करण्याची शक्यता असून कॉल ड्रॉपचे प्रमाण गेल्या सहा महिन्यात दुपटीने वाढल्यामुळे सर्वच स्तरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. व्होडाफोन, एअरसेल या कंपन्यांच्या कॉल ड्रॉपच्या प्रमाणात गेल्या काही दिवसात वाढ झाल्याचे ट्रायच्या सुत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे यापुढील काळात कॉल ड्रॉपचे प्रमाण घटविण्यासाठी दुरसंचार कंपन्यांना आपल्या कामकाजात चांगलीच सुधारणा करावी लागणार आहे.

Leave a Comment