एलियन हंटर्सचा दावा; मंगळावर आहे गौतम बुद्ध यांचा पुतळा

mars
मंगळ ग्रहावर गौतम बुद्ध यांचा पुतळा असल्याचा दावा एलियन हंटर्सच्या टीमने केला आहे. हा दावा नासाच्या मार्स रोव्हरने पाठविलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करुन करण्यात आला आहे. एलियन हंटर्स टीमचे स्कॉट सी वॅरिंग यांनी सांगितले, की सूर्यमंडळातील या तांबड्या ग्रहावर जिवसृष्टी असल्याचा हा पुरावा आहे. दरम्यान, नासाने याबाबत काही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.

स्कॉट सी वॅरिंग यांनी सांगितले, की नासाला एलियनशी संबंधित कोणतीही माहिती जाहीर करायची नाही. त्यांना या बाबी लपवून ठेवायच्या आहेत. पण मार्स रोव्हरने पाठविलेल्या अनेक छायाचित्रांमध्ये हे सिद्ध झाले आहे, की मंगळावर जिवसृष्टी आहे. यापूर्वी मंगळावर पिरॅमिड सारखी आकृती दिसल्याचा दावा करण्यात आला होता.

Leave a Comment