अ‍ॅपलकडून मायक्रोप्रोसेसर तंत्रज्ञानाचा पेटंटभंग

apple
न्यूयॉर्क – अमेरिकेत भारतीय अभियंत्यांनी तयार केलेल्या स्पेशालाईज मायक्रोप्रोसेसरच्या तंत्रज्ञानाच्या पेटंटची लढाई जगप्रसिद्ध आयफोन या स्मार्टफोनसाठी ओळखल्या जाणा-या अ‍ॅपलला गमवावी लागली आहे. २०१४मध्ये विस्कॉनसिन अ‍ॅल्युम्नी रिसर्च फाऊंडेशनने केलेल्या फौजदारी तक्रारीवर फेडरल कोर्टाने अ‍ॅपलकडून पेटंटचे उल्लंघन झाल्याचा निकाल दिला आहे. याप्रकरणी कंपनीला ८६.२४ कोटी (सुमारे ५५०० कोटी रुपये) डॉलरचा दंड होण्याची शक्यता आहे.

या तंत्रज्ञानाचे १९९८मध्ये स्पेशलाईज्ड मायक्रोप्रोसेसर हे तंत्रज्ञान यूडब्ल्यू-मॅडिसन मायक्रोप्रोसेसर आर्किटेक्चर संशोधक तेरानी विजयकुमार, गुरिंदर सोही, अँड्रियास मोशेव्होस आणि स्कॉट ब्रीच यांनी पेटंट केल्याचे तक्रारीत नमूद होते. या प्रकरणी ज्युरींनी स्मार्टफोन आणि कॉम्प्युटर निर्मात्या अ‍ॅपलने टेबल बेस्ड डेटा स्पेक्युलेशन सर्किट फॉर पॅरलल प्रोसेसिंग कॉम्प्युटर’ हे तंत्रज्ञान वापरल्याचा निकाल दिला.

अ‍ॅपलकडून फाऊंडेशनने यामधून झालेल्या नुकसानापोटी ८६.२४ कोटी डॉलरच्या भरपाईची मागणी केली आहे. मात्र ज्युरींनी नुकसानभरपाईचे आदेश अद्याप दिलेले नाहीत. हे तंत्रज्ञान विकसित करणा-यांत समावेश असणा-या विजयकुमार आणि सोही यांनी राजस्थानमधील पिलानी येथील बिर्ला इन्स्टिटय़ुटशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून पदवीपूर्व शिक्षण घेतले आहे.

Leave a Comment