अर्ज मिळताच तीन तासात खात्यावर जमा होणार पीएफ

pf
नवी दिल्ली – पीएफ काढण्यासाठी करावी लागणारी ‘कारकुनी’ लवकरच इतिहासजमा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डाच्या ऐच्छिक वापराबाबत दिलेल्या निकालानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफ काढण्यासाठी ऑनलाईन सुविधा मार्चअखेरीस सुरू होण्याबाबत आशा व्यक्त केली आहे.

सध्याची ऑफलाईन प्रक्रिया ही खुप वेळखाऊ असल्यामुळे ही नवी सुविधा कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. त्यापुर्वी या महिन्यापासून ज्या कर्मचाऱ्यांनी आधार कार्ड जोडणी केली आहे, त्यांचे पीएफ २० दिवसांऐवजी तीन दिवसांत मिळवून देण्यासाठी ईपीएफओ प्रयत्न करणार असल्याची माहिती ईपीएफओचे आयुक्त के. के. जालान यांनी दिली.

तसेच सर्वोच्च न्यायालयाने निवृत्तिवेतन, जन-धन यासारख्या सरकारी योजनांसाठी आधार कार्ड वापरण्यास परवानगी दिल्यानंतर ईपीएफओने पीएफ खाती आधार कार्डाशी जोडण्याचा निर्णय घेतला असल्याचेही जालान यांनी सांगितले.

Leave a Comment