एअरबसने त्यांच्या अतिवेगवान विमानासाठी रॉकेट मोटर प्रोपेल्ड तंत्रज्ञानासांठीचे पेटंट घेतले असून यामुळे प्रवाशांना न्यूयार्क ते लंडन हा एरवी आठ तासांचा असलेला प्रवास १ तासात करता येणार आहे.
एअरबसने लंडन ते न्यूयॉर्क केवळ १ तासात
एअरबसने काँकार्ड टू सुपरसॉनिक जेटसाठी हे पेटंट घेतले असून त्यात तीन विविध इंजिनांचे कॉबिनेशन केले गेले आहे. टर्बोजेट, रॅमजेट व रॉकेट मोटर यांच्या एकत्रीकरणातून या विमानाचे इंजिन काम करणार आहे. त्याचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा साडेचार पट अधिक आहे तर मूळ काँकार्डच्या वेगापेक्षा तो तिप्पट अधिक आहे.
एअरबसच्या या विमानातून १९ प्रवासी एकावेळी प्रवास करू शकणार आहेत. एरोडायनामिक डिझाईनच्या या एअरक्राफ्टसाठीचे पेटंट यूएस सरकारने जुलैमध्ये मंजूर केले होते. यापूर्वीची सर्वात वेगवान म्हणून ओळख असलेली काँकार्ड विमाने त्यातील कांही दोषांमुळे कायमस्वरूपी वापरातून २००३ सालीच बंद केली गेली आहेत.