आला सँमसंगचा टायझन स्मार्टफोन ‘झेड३’

samsung
नवी दिल्ली – टायझन बेस्ड असलेला दुसरा स्मार्टफोन झेड३ सँमसंगने लाँच केला आहे. हे लाँचिंग दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आले. अनेक उत्कृष्ट फिचर्सने युक्त असलेला हा स्मार्टफोन पूर्णपणे भारतात तयार करण्यात आला आहे. कैलाश खेर यांच्या खास बँडने या लाँचिंग कार्यक्रमात परफॉर्म करत एक वेगळीत रंगत आणली.

८ मेगापिक्सल एलईडी फ्लॅशसह या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. तसेच ५ मेगापिक्सल वाईड एंगल सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. ८४९० रुपयांत हा फोन उपलब्ध होणार आहे. तातडीने हा फोन घेण्यासाठी स्नॅपडील साईटवर हा फोन उपलब्ध आहे.

Leave a Comment