येथे पुरूष गोषात आणि बायकांना मुक्त स्वातंत्र्य

afrika
जगभरातील बहुतेक देशांत महिलांवर असलेल्या अनेक बंधनांबाबत सतत चर्चा होत असते. मात्र जगात एक देश असाही आहे जेथे पुरूषांवर अनेक बंधने आहेत आणि महिलांना मुक्त स्वातंत्र्य आहे. दक्षिण आफ्रिकेतील नायजरजवळ असलेल्या तुआरेग जमातीत ही परंपरा पाळली जाते.

जगभरात महिलेचे शील हाच तिचा मुख्य दागिना समजला जात असताना या जमातीत मात्र या बाबतीत महिलांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. म्हणजे लग्नापूर्वीही अनेक पुरूषांशी संबंध ठेवण्याची परवानगी आहेच पण लग्नानंतरही हे स्वातंत्र्य दिले जाते. महिलांना स्वतःचे लग्न स्वतःच्या मनाप्रमाणे करता येते. येथे पुरूषांना महिलांचा मान ठेवावा लागतो आणि त्यांना महिला गोषा वापरतात तसा गोषा वापरावा लागतो. मुले तरूण झाली की त्यांना चेहरा झाकावा लागतो. तसा येथे नियमच आहे.

घटस्फोट घेताना महिला कधीही नवरा सोडू शकतात व त्याच्याकडूनच त्याबद्दल भरपाईही घेतात. त्यामुळे येथे लग्न आणि घटस्फोट हे नित्याचे आहेत. नवरा सोडून आलेल्या महिलेचे कुटुंबिय त्याबद्दल जल्लोश साजरा करतात. विशेष म्हणजे घटस्फोट मिळालेल्या नवर्‍याला येथे कमी भाव असतोच पण विवाहित पुरूषांनाही कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर प्रथम बायकोची परवानगी घ्यावी लागते व तिची संमती असेल तरच निर्णय घेता येतो.

Leave a Comment