फ्लिपकार्टची १० तासात ५ लाख हॅण्डसेटची विक्री

flipkart
मुंबई – ऑनलाईन विक्रीसाठी प्रसिध्द असलेल्या फ्लिपकार्टच्या सेलमध्ये ग्राहकांनी मोबाईल खरेदीला सर्वाधिक पंसती दिल्याचे दिसत आहे. अवघ्या दहा तासात मोबाईलच्या पाच लाख हॅण्डसेटची विक्री झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन कुठल्याही व्यासपीठावरील भारतातील मोबाईल विक्रीचा हा विक्रम असल्याचा दावा फ्लिपकार्टने केला आहे.

१३ ऑक्टोंबरला फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज फेसटीव्ह सेल सुरु झाला असून, १७ ऑक्टोंबरपर्यंत हा सेल चालणार आहे. बिग बिलियन डेज फेसटीव्ह सेलमध्ये बंगळूरु, दिल्ली आणि मुंबई ही शहरे ऑनलाईन खरेदीमध्ये आघाडीवर असून, टायर टू मध्ये मोडणारी नागपूर, इंदूर, कोईमबतोर, विशाखापट्टणम आणि जयपूर या शहारांमधूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कंपनीने सांगितले.

ज्या मोबाईल फोनची दहा तासात विक्री झाली आहे त्यातील ७५ टक्के फोन ४ जी कनेक्शनचे आहेत. सेलच्या पहिल्या दिवशी फ्लिपकार्टने पहिल्या १० तासात १० लाख उत्पादनांची विक्री केली होती. संपूर्ण देशातून साठ लाख लोकांनी फ्लिपकार्टच्या संकेतस्थळाला भेट दिली होती. एक सेकंदामध्ये २५ वस्तूंची विक्री झाली होती.

Leave a Comment