डिझेल महागले

disesl
नवी दिल्ली : डिझेलच्या दरात प्रतिलिटर ९५ पैशांनी वाढ करण्याचा निर्णय आज घेण्यात आला असून, गुरुवारी मध्यरात्रीपासूनच ही दरवाढ लागू झाली आहे. पेट्रोलचा दर तूर्त जैसे थे ठेवण्यात आला आहे. मात्र, भविष्यात त्यात वाढ होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या पाच सत्रांत आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती १० टक्क्यांनी वाढल्यामुळे देशातील ऑईल कंपन्यांवर अतिरिक्त बोजा पडत आहे. याचा विचार करून डिझेलच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment