भारतात कोट्याधीशांची संख्या वाढणार

millionire
मुंबई: आगामी पाच वर्षात कोट्याधीश व्यक्तींच्या संख्येत तब्बल 65 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा अंदाज क्रेडिट सुईस ए जी या वित्तसंस्थेने जाहीर केलेल्या सन 2015 च्या जागतिक वित्त अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ज्या व्यक्तींची व्यक्तिगत मालमत्ता किमान एक दशलक्ष डॉलर्स एवढी आहे; अशा व्यक्तींची संख्या भारतात सध्या 1 लाख 85 हजार एवढी असून सं 2020 पर्यंत ही संख्या 3 लाख 5 हजारांपर्यंत वाढेल; असे हा अहवाल सांगतो.

भारतातील मध्यमवर्गाच्या व्यक्तिगत संपत्तीमध्ये सन 2000 च्या तुलनेत 150 टक्क्यांनी वाढ झाली असून ती एकूण जगातील मध्यमवर्गाच्या वाढीच्या सुमारे दुपटी एवढी आहे. मात्र आपला शेजारी असलेला चीन या बाबतीत खूपच आघाडीवर असून तेथील मध्यमवर्गाची संपत्ती तब्बल 330 टक्क्यांनी वाढली आहे. एकूण जगातील मध्यमवर्गाकडे असलेल्या संपत्तीत 44.4 ट्रिलियन डॉलर्स वरून (2000) 80.7 ट्रिलियन डॉलर्स (2015) एवढी वाढ झाली आहे. या वाढीचे प्रमाण एशिया पॅसिफिक क्षेत्रात 70 टक्के; आफ्रिकन देशात 102 टक्के; तर लॅटिन अमेरिकन देशात 109 टक्के आहे.

मात्र हा अहवाल तयार करताना मध्यमवर्गाची व्याख्या ही उत्पन्नावरून नव्हे तर व्यक्तिगत संपत्तीवरून करण्यात आली आहे. उदाहरणार्थ सन 2015 साठी हा निकष 50 हजार ते 5 लाख डॉलर्सची व्यक्तिगत मालमत्ता असा आहे. त्यानुसार भारतातील केवळ 3 टक्के लोकांचा समावेश मध्यमवर्गीयात होऊ शकतो; हे उल्लेखनीय!

Leave a Comment