पेप्सीचा स्मार्टफोन येतोय

pepsi
फूड अॅन्ड बेवरीज क्षेत्रातील दिग्गज कंपनी पेप्सिको स्मार्टफोन क्षेत्रात उतरत असल्याची चर्चा कांही काळ सातत्याने होत होती मात्र या अफवा असाव्यात असाही तर्क लढविला जात होता. आता मात्र या सर्व तर्कविर्तकांना पूर्णविराम देत पेप्सिकोने त्यांचा पेप्सी पी १ हा स्मार्टफोन लवकरच बाजारात दाखल होत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या फोनच्या निमित्ताने पेप्सिको सध्या चलती असलेल्या स्माटफोन बाजारात आपले खाते उघडत आहे.

पेप्सी पी वन अँड्राईड स्मार्टफोनचे कांही फोटो नुकतेच लिक झाले आहेत त्याचबरोबर कंपनीच्या प्रवक्त्त्याने चीनमध्ये कंपनी लवकरच मोबाईल फोन्स व अॅकसेसरीजची एक पूर्ण मालिका सादर करणार असल्याचेही सांगितले आहे. त्यात पी १ चा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार या फोनसाठी ५.५ इंची स्क्रीन, फिंगरप्रिट सेन्सर, १३ एम.पी.कॅमेरा अशी फिचर्स असतील असे सांगितले जात आहे. फिचर्स बाबत अधिक माहिती दिली गेलेली नसली तरी हा बजेट फोन आहे असे समजते. या फोनसाठीचे परवाने मिळविण्याचे काम अंतिम टप्प्यात असलेल्याचेही सांगितले जात आहे.
———

Leave a Comment