कटू आठवणी विसरण्यास फेसबुकची मदत

facebook
वॉशिंग्टन: आपल्याला हव्याहव्याशा आठवणींना उजळणी देण्यासाठी ‘फेसबुक’ने ‘ऑन धिस डे’ ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र त्याच दिवसातील नकोशा आठवणी दूर करण्यासाठी त्यात आता नवीन ‘फिल्टर्स’ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

विशिष्ट दिवसातील आपल्या पोस्ट्स किंवा इतरांनी आपल्याला टॅग केलेल्या पोस्ट्स ‘ऑन धिस डे’ या सुविधेमार्फत फेसबुक युजर्सना पाहता येतात. मात्र त्याच दिवसातील काही पोस्ट्स किंवा टॅग यांच्या आठवणी आपल्याला नकोशा असू शकतात अशा आठवणी मिटविण्यासाठी हे फिल्टर्स आपल्याला उपयोगी पडणार आहेत.

हे फिल्टर्स वापरण्यासाठी फेसबुक युजर्सनी ‘अॅप’ विभागात जाऊन ‘ऑन धिस डे’ हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर त्या दिवसाच्या पोस्ट दिसू लागताच उजव्या बाजूला असलेल्या ‘प्रेफरन्सेस’ या पर्यायात हे फिल्टर्स उपलबद्ध आहेत.

मागील आठवड्यात फेसबुकने प्रायोगिक तत्वावर ‘रिअॅक्शन्स’ या नव्या सुविधेच्या चाचण्या घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या केवळ आयर्लंड आणि स्पेन येथे प्रायोगिक तत्वावर ही सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेनुसार ‘लव्ह’, ‘सॅड’, ‘अँग्री’ या सह yay, wow, haha या भावना व्यक्त करता येणार आहेत.

Leave a Comment