अरूण जेटली ठरले आशियातील उत्तम अर्थमंत्री

arun
लंडन येथील प्रतिष्ठीत मासिक इमर्जिंग मार्केटस ने भारताचे अर्थमंत्री अरूण जेटली यांना यावर्षीच्या फायनान्स मिनिस्टर ऑफ द इयर आशिया सन्मानाने गौरविले आहे. गेल्या दीड वर्षात भारताने आर्थिक क्षेत्रात जी सफलता प्राप्त केली त्यासाठी या पुरस्काराचे जेटली हक्कदार आहेत असे या मासिकातील लेखात नमूद करण्यात आले आहे.

या लेखानुसार भारतातील आर्थिक सुधारणांचे सारे श्रेय पंतप्रधान मोदी आणि रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांना आत्तापर्यंत दिले गेले आहे. मात्र भारताला आर्थिक विकासाची दिशा देण्यासाठी अर्थमंत्री जेटली यांनी घेतलेले कांही निर्णय आणि राबविलेली धोरणे याशिवाय हे यश शक्य झाले नसते. चीनला मागे टाकून विकासदरात भारताने घेतलेली आघाडी जेटली यांच्यामुळेच शक्य झाल्याचेही नमूद केले गेले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा विकास दर साडेसात टक्कयांवर जाईल असा अंदाज दिला आहे त्याचे श्रेयही जेटली यांचेच आहे. भारतात राबविल्या गेलेल्या जनधन योजनेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले आहे त्यातही जेटली यांच्या कर्तृत्वाचा मोठा वाटा आहे.

गतवर्षी या मासिकाने रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांची आशिया सेंट्रल बँक गर्व्हनर ऑफ इयर पुरस्कारासाठी निवड केली होती तर प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना त्यांनाही फायनान्स मिनिस्टर ऑफ द इयर या पुरस्काराने २०१० साली गौरविले गेले होते.

Leave a Comment