ह्युंदाईच्या ‘एलीट आय २०’ची मर्यादित आवृत्ती

hyundai
मुंबई: इंटरनॅशनल कार ऑफ द इयर हा महत्वाचा किताब आणि शौकीनांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या ह्युंदाई आय २० या कारची ‘एलिट आय २०’ ही मर्यादित आवृत्ती सादर करून या कारची पहिली ‘अॅनिव्हर्सरी’ कंपनी साजरी करणार आहे.

ही कार केवळ स्पोर्ट्स प्रकारात उपलब्ध असणार आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या मॉडेलची किंमत ६ लाख ६९ हजार रुपये; तर डिझेल मॉडेलची किंमत ७ लाख ८४ हजार असणार आहे.

१६ इंच एलॉय व्हील्स, अॅल्युमिनिअम पेडल आणि बूटलिडवर एम्ब्लेम ही या सेलिब्रेशन एडीशनची वैशिष्ट्य आहेत. तांत्रिकदृष्ट्या आय २० आणि या सेलिब्रेशन एडीशनमधील कार यांच्यात कोणताही फरक नाही.