फेसबुकचे थ्रीडी टच फिचर लाँच

face-book
सोशल नेटवर्कींग साईट फेसबुकने थ्रीडी टच फिचरचे नवीन अपडेट लाँच केले असून त्यामुळे कोणताही फोटो, व्हिडीओ अथवा स्टेटस पोस्ट डोळ्याची पापणी लवेपर्यंतच अपलोड करता येणार आहे. सध्या हे अपडेट फक्त आयफोन सिक्स एस आणि सिक्स प्लसवरच दिले गेले आहे.

टेक वेबसाईट टेक क्रंचवर दिल्या गेलेल्या माहितीनुसार आयओएस प्लॅटफॉर्म बेस्ड आयफोन सिक्स एस आणि प्लस च्या फेसबुक अॅप आयकॉनवर हार्ड प्रेस केल्यानंतर फोटो व्हिडीओ स्टेटस पोस्ट करण्याचे शॉर्टकटस उघडणार आहेत. अॅपल वॉचच्या फोर्सटच प्रमाणेच हे फिचर काम करणार आहे. मात्र यामुळे फेसबुकचा वेग प्रचंड वाढू शकणार आहे.

हे फिचर फेसबुकच्या आयओएस बेस्ड इंस्टाग्रामवर यापूर्वीच लाँच केले गेले आहे. त्याच्या मदतीने दीर्घ काळपर्यंत फोटो पोस्ट करता येतात. फेसबुकचे ७.८ व्हर्जन आयओएस ९, आयफोन सिक्स एस व प्लससाठी आहे.

Leave a Comment