मुंबई : भारतात मोबाईल कंपनी सोनीचे एक्सपिरिया झेड ५, एक्सपिरिआ झेड ५ प्रीमियम फोन लाँच होण्याच्या तयारीत असून एक्सपिरिआ झेड ५ हा आधीच्या श्रेणीतील त्याच फोनचे अपडेटेड वर्जन असेल, तर एक्सपिरिआ झेड५ प्रीमियम हा डिस्प्लेच्या बाबतीत नवी उंची गाठण्याच्या तयारीत आहे. आयफोन ६एस, ६एस प्लस, नेक्सस ६पी यासारख्या स्मार्टफोन्सना तोडीस तोड टक्कर देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आयफोनला टक्कर देणार सोनीचे एक्सपिरिया झेड५, झेड५ प्रीमियम
काय आहेत एक्सपिरिया झेड ५ प्रीमियमची वैशिष्ट्य – या फोनमध्ये ५.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असून पिक्सेल डेन्सिटी ५०६ पीपीआय एवढी आहे. या फोनची बॅटरी ३,४३०mAh क्षमतेची आहे. त्याचबरोबर २ दिवसांचा बॅटरी बॅकअप देखील मिळतो. हा फोन क्रोम, गोल्ड, ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. हा फोन सिंगल आणि ड्यूएल सिम व्हेरिअंटमध्ये देखील मिळणार आहे. या फोनची मेमरी ३२ जीबीपासून २०० जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा देण्यात आली आहे.
काय आहेत एक्सपिरिया झेड ५ ची वैशिष्ट्य – या फोनमध्ये ५.२ इंचाचा एचडी डिस्प्ले असून क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८१० SoCचा प्रोसेसर देण्यात आला आहे. या ३जीबीचे रॅम देण्यात आले आहेत. त्याचबरोबर हा फोन
क्रोम, गोल्ड, ब्लॅक रंगात उपलब्ध होणार आहे. यात ३२जीबीची मेमरी क्षमता आहे. सोनी एक्सपिरिया झेड५ चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पॉवर बटन. हे बटन फिंगरप्रिन्ट सेंसरप्रमाणेही काम करते.