गुगलचा डूडलमार्फत नुसरत फतेह अलींना सलाम !

google
मुंबई : गुगलने प्रसिद्ध पाकिस्तानी सूफी गायक आणि शहेनशाह-ए-कव्वाली अशी ख्यातीप्राप्त नुसरत फतेह अली खान यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त डूडलद्वारे या महान गायकाला अभिवादन केले आहे.

१३ ऑक्टोबर १९४८ मध्ये पाकिस्तानच्या फैसलाबाद येथे नुसरत फतेह अली खान यांचा जन्म झाला होता. त्यांच्या सूफी आणि कव्वालींमुळे नुसरत फतेह अली खान हे भारत आणि पाकिस्तानात प्रसिद्ध होते. वयाच्या ४८ व्या वर्षी ऑगस्ट १९९७ मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनावरून मुंबईत कालच मोठा वाद झाला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला शिवसेनेने विरोध केला होता. त्याचा भाग म्हणून शिवसेनेने या कार्यक्रमाचे आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांना काळे फासले होते. याचाच संदर्भ देत सोशल मीडियावर आजच्या डूडलवरून चर्चा सुरू आहे. पाकिस्तानी कलाकारांची विरोध करणारे आता डूडलचा विरोध कसा करणार, असा सवाल नेटीझन्स उपस्थित करत आहेत.

Leave a Comment