वनप्लस भारतात करणार फोन उत्पादन

oneplus
चीनी स्मार्टफोन कंपनी वनप्लस ने आंध्रातील फॉक्सकॉनच्या श्रीसिटी फॅसिलीटीमध्ये त्यांच्या फोनची असेंब्ली करण्यात येणार असल्याचे जाहीर केले असून फॉक्सकॉन आणि आंध्र सरकारने या संदर्भात दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. या फॅसिलीटीतील वन प्लस स्मार्टफोनची पहिली बॅच या वर्षअखेर बाजारात दाखल होईल असे समजते.

वन प्लसचे सहसंस्थापक आणि सीईओ पीट लाऊ या संदर्भात म्हणाले की भारतात फोन उत्पादन करण्याचा आमचा निर्णय आजपर्यंत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयातील एक आहे. फॉक्सकॉन आणि आंध्र सरकारच्या सहकार्यामुळे हे शक्य होते आहे. भारत जगातील मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे आणि आमच्यासाठीही तो महत्त्वाचा बाजार आहे.येथेच आम्ही उत्पादन केले तर आम्हाला आमचे पाय या बाजारपेठेत रोवणे अधिक सुलभ होणार आहे कारण आमच्या फोन उत्पादनाचा खर्च कमी झाल्याने किमती कमी करता येणार आहेत. शिवाय मागणीनुसार त्वरीत पुरवठा करणेही शक्य होणार आहे.

वन प्लस इंडियाचे जनरल मॅनेजर विकाल अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार या फॅसिलीटत दरमहा ५ हजार स्मार्टफोन तयार केले जाणार आहेत आणि त्यामुळे १ हजार लोकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment