लंडन : बायकांच्या मनात नेमके काय चालले हे कळत नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर असे म्हणणारे तुम्ही एकटेच नाही. तर तुमच्या जोडीला जग प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हे देखील आहेत.
जगातील सर्वात मोठे गूढ म्हणजे स्त्री : स्टीफन हॉकिंग
नुकताच त्यांनी रेडिट या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. त्यामध्ये जगातील सर्वात मोठे गूढ काय ? हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्याचे उत्तर त्यांनी दिले ‘स्त्री’ . माझ्या व्यक्तीगत अनुभवाहून मला असे वाटते की स्त्री ही जगातील सर्वात मोठे गूढ आहे. माझ्या जवळ भौतिक शास्त्रातील पीएचडी आहे परंतु सर्वात मोठे गूढ मला स्त्री हेच वाटते असे त्यांनी म्हटले. रोबोट मानवांवर राज्य करतील का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यांनी त्याचे उत्तर सकारात्मक दिले आहे. ही शक्यता असल्याचे त्यांनी त्यांच्या उत्तरातून सांगितले आहे. पूर्वजांपेक्षा येणा-या पिढीकडे ही नेहमीच जास्त बुद्धीमान असते. आपण वानरांसारखे दिसणा-या आपल्या पूर्वजांहून अधिक बुद्धिमान आहोत. आइनस्टाईन हा त्याच्या पालकांपेक्षा बुद्धिमान होता असे उत्तर त्यांनी दिले. जर मानवाची सर्व कामे रोबोट करू शकेल तर बेरोजगारीची स्थिती निर्माण होईल का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. जर, तंत्रज्ञानामुळे तयार होणारी उत्पादने आणि सेवांचे जर वाटप योग्य प्रमाणात झाले.