कैंची धाममध्ये भाविकांची रीघ

neem
पंतप्रधान मोदींबरोबरच्या मुलाखतीत फेसबुकचा मार्क झुकेरबर्ग याने त्याच्या जीवनाला दिशा देण्यासाठी भारतातील एका मंदिरात गेल्याचे नमूद केल्यानंतर आणि हे मंदिर म्हणजे नैनितालपासून जवळ असलेले नीम करोली बाबा या सिद्धपुरूषाने स्थापलेले कैंची धाम मंदिर असल्याची बातमी फुटल्यानंतर गेल्या कांही दिवसांत या मंदिरात भाविकांची अक्षरशः रीघ लागली असल्याचे मंदिर ट्रस्टी सांगत आहेत.

झुकेरबर्ग आणि अॅपलच्या स्टीव्ह जॉब्जने या मंदिरात येऊन त्यांच्या कठीण काळात योग्य ती दिशा येथे मिळाल्याचे उघड झाल्यापासून येथे अचानक भाविकांची गर्दी वाढली आहे. इतकेच नव्हे तर देशाच्या सर्व भागातून चौकशी करत करत लोक येथे येत आहेत आणि चौकशी करताना झुकेरबर्गचे मंदिर कुठे आहे अशी चौकशी करत असल्याचेही ट्रस्टी म्हणाले.

यापूर्वी दिवसाकाठी जेमतेम ५० लोक येथे येत असत मात्र गेले कांही दिवस त्यांची संख्या वाढत चालली असून सध्या दररोज २०० ते २५० लोक येथे येऊ लागले आहेत. बहुतेक सर्वजण आपल्याही आयुष्यात चांगले कांही तरी घडावे याच आशेने येत आहेत. ज्या बाबांनी हे मंदिर स्थापन केले ते नीम करोली बाबा दिव्य शक्ती प्राप्त असलेले संत होते. १९४२ मध्ये ते नैनितालच्या पहाडांत मुक्कामास आले होते आणि १९६२ मध्ये त्यांनी कैंचीधामची स्थापना केली होती. बाबांचे ७४ साली निधन झाले आहे.

Leave a Comment