बेचाळीस वधूंसाठी ५ हजार वरांची रांग

kurmi
गुजराथेत पटेल समाजाच्या आरक्षणासाठी एकीकडे हार्दिक पटेलने आंदोलन खडे केले असतानाच सुरतच्या पाटीदार पटेल समाजानेही आपल्या समाजातील उपवर मुलांसाठी वधू शोधण्यासाठी मदत करण्याचे आंदोलन हाती घेतले आहे. यात दुसर्‍या राज्यातील कुर्मी समाजातील मुली मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात असून प्रथमच ओदिशातील कुर्मी परिवारातील ४२ उपवर मुली विवाह मेळाव्यासाठी आणल्या गेल्याचे समजते. गरीब परिवारातील या मुलींसाठी ५ हजार पाटीदार पटेल तरूण रांगेत उभे होते.

गुजराथेत महिला पुरूष रेशो अत्यंत खराब आहे. परिणामी हरियाना राजस्थानप्रमाणेच येथील तरूण मुलांना लग्नासाठी मुली मिळणे दुरापास्त बनले आहे. त्यासाठी अन्य राज्यातील कुर्मी समाजाच्या मुलींना गुजराथेत आणण्याचे प्रयत्न वरील संस्था करत आहे. ओडिशातून आलेल्या या मुली कपडे विणण्याचे काम करणार्‍या गरीब कामगारांच्या मुली आहेत. शुक्रवारी पार पडलेल्या या मेळ्यात सर्व मुलींची लग्ने पक्की झाली असून १६ आक्टोबरला त्यांचा सामुहिक विवाहसोहळा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

गुजराथी पाटीदार समाजाने लग्नाऊ मुलांना मुली मिळण्यात येत असलेली अडचण लक्षात घेऊन बेटी रोटी परंपरा सुरू करण्याचे कामही हाती घेतले आहे.