रोबोहेन – जपानी रोबोटिक स्मार्टफोन

robot
जपानच्या शार्प कंपनीने रोबोहेन नावाने रोबोटिक स्मार्टफोन जपानच्या बाजारपेठेत सादर केला आहे. हा स्मार्टफोन सर्वसामान्य रोबोंप्रमाणे उठणे, बसणे, नाच करणे, हात हालविणे ही कामे करतोच पण त्याचा वापर स्मार्टफोन म्हणूनही करता येतो.

रोबोहेन स्मार्टफोनची लांबी ७.६ इंच आहे आणि त्याचे वजन आहे ३९० ग्रॅम.याचा वापर कॉल करणे, कॉल रिसिव्ह करणे, मेसेज , ईमेल करणे यासाठी होतोच पण तो अॅपलच्या सोरी व गुगलच्या नाऊ प्रमाणे डायलॉगची उत्तरेही देतो. या रोबो स्मार्टफोनसाठी २ इंची टचस्क्रीन डिस्प्ले दिला गेला आहे. अँड्राईडवर चालणारा हा फोन थ्रीजी नेटवर्कला सपोर्ट करतो. रोबोच्या डोळ्यात पॉवरफुल कॅमेरा आहे व डोक्यावर दिल्या गेलेल्या पीको प्रोसेसरमुळे काढलेले फोटो पाहण्याची सोय आहे. स्पीकर ऑन करून यावर संभाषण करता येते आणि हा फोन व्हॉईस कमांड ऑपरेटही करू शकतो. याची किंमत समजू शकलेली नाही.

Leave a Comment