डेबिट-क्रेडीट कार्ड हाताळण्याचे १० सुरक्षित मार्ग

atm
आजकाल एटीएम वापरणार्‍यांचे प्रमाण वाढते आहे आणि भविष्यात एटीएम द्वारेच सर्व व्यवहार होऊ शकणार आहेत. मात्र आजही बहुतेकजण एटीएम चा वापर पैसे काढणे आणि भरणे अथवा बॅलन्स चेक करणे इत्यादींसाठीच करताना दिसतात. वास्तविक ग्राहकांसाठी बँकांनी एटीएमच्या सुविधांत अनेक फिचर्स अॅड केली आहेत. या फिचर्समुळे एटीएमचा वापर अनेक कारणांसाठी करता येतो त्याची ही माहिती.
credit-card
१) क्रेडिट कार्ड पेमेंट- या सुविधेनुसार तुमची बिले भरता येतात मात्र त्यासाठी तुमचे क्रेडीट कार्ड आणि डेबिट कार्ड एकाच बँकेचे हवे. ट्रान्झॅक्शनसाठी बँकेच्या एटीएममधून, जेथे आपले अकौंट आहे तेथून क्रेडीट कार्ड पेमेंट ऑप्शन येते तेथे क्लीक करावे लागते.
pay
२) ट्यूशन फी, अॅप्लीकेशन फॉर्म भरण्यासाठीही एटीएमचा वापर करता येतो. आजकाल अनेक शैक्षणिक संस्थानी बँकांशी अॅप्लीकेशन व ट्यूशन फी एटीएममधून भरण्यासाठी टायअप केले आहे. कॉलेज परिसरातील एटीएम मध्ये ही सुविधा आहे. अर्थात त्यासाठी एटीएमसह आपले अकौंट रजिस्टर करावे लागते. त्याची रिसीटही आपल्याला एटीएममधून मिळते.

३)पे युटिलीटी बिल वर डिस्काऊंट मिळविणेही एटीएमचा वापर करून शक्य आहे. एटीएममधून वीजबिले, टेलिफोन बिले, विमा पेमेंट यासारखी युटिलिटी पेमेंट करण्यासाठी अनेक बँकांनी संबंधित विभागांशी टायअप केला आहे. त्यात या बिलांवर ०.५ ते १ टक्का डिस्काउंट मिळतोच शिवाय वेळ आणि पैशाची बचतही होते.

४)टॅक्स पेमेंट करताना डेबिट कार्डला टॅक्स पेमेंटसाठी रजिस्टर करावे लागते व त्यासाठी एक फॉर्म भरून द्यावा लागतो. त्यात पॅन नंबरसह टॅक्स डिडक्शन ऑप्शन मिळतो. हे रजिस्ट्रेशन एकदाच करावे लागते. टॅक्स डिडक्शनची वेगळी रिसीट स्पेशल नंबरसह मिळते.

५)रेल्वे विमान तिकीटे काढण्यासाठीही एटीएमचा वापर करता येतो. बँकांनी एअरलाईन्स आणि रेल्वेबरोबर त्यासाठी करार केला आहे. एसबीआय, पीएनबी,बीओबी अशा कांही बँकाचा त्यात समावेश आहे.
mobile
६)मोबाईल रिचार्जसाठी एटीएम हा चांगला ऑप्शन आहे. त्यात ऑप्शनमध्ये जाऊन नंबर व रिचार्ज किंमत टाकावी लागते.

७)फंड ट्रान्स्फरची सुविधाही एटीएम मध्ये मिळू शकते मात्र त्यासाठी ज्या अकौंटमध्ये फंड ट्रान्स्फर करायचा तो तुमच्या अकौंटशी लिंक असावा लागतो. नसेल तर आपल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन रिक्वेस्ट दिली की त्यानुसार जास्तीत जास्त १० खाती लिंक करता येतात. अर्थात फंड ट्रान्स्फरसाठी प्रत्येक बँकेची लिमिट वेगवेगळी असते.

८) फिक्स डिपॉझिट करण्यासाठीही एटीएमचा वापर करता येतो. आयसीआयसीआय बँकेकडून डिपॉझिटसाठी ९९० दिवसांचे एफडी ऑप्शन दिले गेले आहे. डिपॉझिटची रिसीट सात दिवसांत मेलवर येते.

९)डोनेशन ऑफर बहुतेक सर्व बँका देतात. यात तुम्हाला हव्या त्या संस्थेला डोनेशन देता येते. त्यावर करसवलत असेल तर रिसीटचा वापर करसवलत घेण्यासाठी करता येतो.

१०)लोन अकौंट- आपण बँकेडून कर्ज घेतले असेल तर आपल्या कर्जाबाबतची सद्यस्थिती एटीएम मधून जाणून घेता येते. म्हणजे अजून किती लोन शिल्लक आहे हे त्यातून समजते. अर्थात सध्या कांही मर्यादित बँकांनीच ही सुविधा दिली आहे मात्र लवकरच ती अन्य बँकातूनही मिळू शकणार आहे.

Leave a Comment