अभिनयाकडून उद्योगाच्या क्षेत्रात प्रवेश करत असलेल्या विवेक ओबेरॉय याने गुजराथ टूरिझम प्रोजेक्टमध्ये ४०० कोटी रूपयांची गुंतवणूक केली असल्याचे समजते. नरेंद्र मोदी गुजराथचे मुख्यमंत्री होते तेव्हाच विवेकने या व्यवसायात २०० कोटींची गुंतवणूक करण्याचा करार सरकारसोबत केला होता. त्यात आता आणखी २०० कोटींची भर घातली गेली आहे.
गुजराथ टूरिझम प्रोजेक्टमध्ये विवेक ओबेरॉयची गुंतवणूक
विवेकने दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादजवळील धोलका येथे हा प्रकल्प विवेक करतो आहे. त्यात १०० एकर जमीनीवर क्लबिंगसह अन्य सुविधा १ वर्षात उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यात कृत्रिम बीच, समुद्राच्या कृत्रिम लाटा हे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण असेल. गोवा थीमवर विवेक येथे वर्ल्ड क्लास रिझॉर्ट बांधत आहे. त्यासंदर्भात त्याने मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यासोबत चर्चा केली आहे. विवेक गुजराथेत बेटी प्रोजेक्टही सुरू करणार आहे. त्यानुसार टाकून दिल्या गेलेल्या अनाथ मुलींची देखभाल केली जाणार आहे.