अंकितला श्रीमंतांच्या यादीतून पडायचेय बाहेर

ankit
भारतातील तरूण अतिश्रीमंतांच्या यादीत सामील असलेल्या अंकित भाटी याने पुढच्या वर्षात या यादीतून बाहेर पडायची इच्छा व्यक्त केली आहे. अंकित ओला कॅब सव्र्हिसचा सहसंस्थापक आहे.

अंकित या विषयी बोलताना म्हणाला की भारतात तरूणांना प्रचंड संधी उपलब्ध आहेत. सध्याचे वातावरण त्याला अतिशय पुरक आहे. भारतातील तरूण अतिश्रीमंतांच्या यादीत नवीन युवकांची भर पडावी अशी माझी इच्छा आहे. आरामदायी नोकरी सोडून कांही तरी वेगळे भव्य दिव्य बनविण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे. तुमची मनापासूनची इच्छा असेल तर संधी आपोआप चालून येतात. आपले लक्ष्य ठरविताना त्यासाठीची तरतूद आहे वा नाही याने कांहीही फरक पडत नाही. धोका पत्करण्याची तयारी असेल तर समस्या आपोआप सुटत जातात.

अंकित म्हणतो, भारतीय युवकांनी अशी धडाडी दाखवायला हवी व माझ्यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी बजावायला हवी.त्यामुळे युवा अतिश्रीमंतांच्या यादीतून मी आपोआप बाहेर होईन आणि माझी जागा नवे उद्योजक घेतील.