आता तीन लाखांत खरेदी करा ३० लाखांचे घर, ९० टक्‍के कर्ज बँक देणार

home-loan
नवी दिल्‍ली – आपले स्वतःचे घर असणाऱ्यांना दिवाळीच्या मुहुर्तावर आहे. केवळ तीन लाख रूपयांत ३० लाख रूपयांपर्यंतचे घर मिळणार आहे. विशेष म्हणजे घर खरेदी करण्‍यासाठी एकूण रकमेच्‍या ९० टक्‍क्‍यांपर्यंत बँक गृहकर्ज देण्याचे निर्देश रिझर्व्‍ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देशातील सर्व बँकांना दिले आहेत.

एखादी प्रॉपर्टी किंवा घर खरेदी करण्‍यासाठी यापूर्वी बँक ८० टक्‍क्‍यांपर्यंत कर्ज देत होती. जर ३० लाख रूपयांपर्यंतची प्रॉपर्टी खरेदी केली तर त्‍यासाठी ग्राहकाला ६ लाख रूपये डाऊनपेमेंट भरावे लागत होते. मात्र, आता नव्या नियमानुसार ग्राहकाला फक्त ३ लाख रूपये भरुन आपले हक्काचे घर खरेदी करण्‍याचा स्‍वप्‍न पूर्ण करता येणार आहे.

आरबीआयच्‍या नव्या नियमानुसार, लोन टू व्‍हॅल्‍यू रेशोमध्ये (एलटीव्‍ही) वाढ झाली असून ३० लाखांपर्यंतचे घर खरेदी करण्‍यासाठी ९० टक्‍यांपर्यंत बँकेतून कर्ज मिळणार आहे. यापूर्वी २० लाखांपर्यंतच हे नियम लागू होते. बँका ३० लाखांपेक्षा जास्त रकमेची प्रॉपर्टी खरेदीसाठी ८० टक्‍के तर ७५ लाखांपेक्षा अधिक प्रॉपर्टी खरेदीसाठी ७५ टक्‍के लोन उपलब्ध करून देतील.

1 thought on “आता तीन लाखांत खरेदी करा ३० लाखांचे घर, ९० टक्‍के कर्ज बँक देणार”

Leave a Comment