अॅमेझॉनची भारतात १२३७ कोटींची गुंतवणूक

amazon
ऑनलाईन शॉपिंग सेवा अॅमेझॉन या अमेरिकन कंपनीला भारतात मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता कंपनीने व्यवसाय वाढीसाठी १२३७ कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर कंपनी गुंतवणूक करत आहे. गेल्य १० महिन्यात कंपनीने विविध वेळी ३ हजार कोटींची गुंतवणूक केली असून पाच महिन्यांपूर्वीच ११५५ कोटी रूपये गुंतविले आहेत असे अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजॉस यांनी सांगितले.

अॅमेझॉन व्यवसाय वाढीसाठी तंत्रज्ञान, मोबाईल, इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॉजिस्टीक क्षेत्रात ही गुंतवणूक करत आहे. बेजॉस म्हणाले आम्ही २०१३ साली भारतात आलो आहोत मात्र गेल्या दोन वर्षात आम्हाला ग्राहकांचा फारच चांगला प्रतिसाद मिळाला आहे व त्यामुळे आमचा उत्साह वाढला आहे. फ्लिपकार्टने भारतात १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती तेव्हाच बेर्जास यांनी अॅमेझॉन भारतात दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल असे जाहीर केले होते.

Leave a Comment