आशियातील ५० श्रीमंत परिवारात भारतातील १४ परिवार

rich
फोर्ब्ज ने नुकत्याच जाहीर केलेल्या आशियातील ५० श्रीमंत परिवारांच्या यादीत भारतातील १४ परिवारांचा समावेश आहे. यंदा प्रथमच फोर्ब्जने अशी आशियाई श्रीमंत परिवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पहिल्या दहांत भारतातील अंबानी परिवार तीन नंबरवर आहे तर प्रेमजी परिवार सातव्या नंबरवर आहे. ही यादी तयार करताना परिवाराची संपत्ती किमान २.९ अब्ज डॉलर्स असणे हा निकष होता आणि ही संपत्ती परिवाराचे स्टॉक आणि त्यांच्या एक्स्चेंज रेटवर ठरविली गेली. या यादीत आशियातील १० देशातील श्रीमंतांचा समावेश आहे.

या यादीत प्रथम स्थानावर सॅमसंगचा ली परिवार आहे. अंबानी परिवाराची संपत्ती २१.५ अब्ज डॉलर्स आहे. प्रेमजी परिवाराची संपत्ती १७ अब्ज डॉलर्स आहे तर दहाव्या स्थानावर असलेल्या मिस्त्री परिवाराची संपत्ती आहे १४.९ अब्ज डॉलर्स. या यादीत गोदरेज परिवार १५ व्या क्रमांकावर आहे. संपत्ती ११.४ अब्ज डॉलर्स. आर्सेलर मित्तल परिवार १९ वे स्थान व संपत्ती १०.१ अब्ज डॉलर्स, बजाज परिवार २९ वे स्थान व संपत्ती ५.६ अब्ज डॉलर्स, डाबर इंडियाचा बर्मन परिवार ३० वे स्थान, संपत्ती ५.५ अब्ज डॉलर्स, कॅडिला हेल्थकेअरचे पटेल ३३ वे स्थान ४.८ अब्ज डॉलर्स, आयशर ग्रुपचा लाल परिवार ४० वे स्थान ४ अब्ज डॉलर्स, श्री सिमेंटचा बांगर परिवार ४२ वे स्थान ३.९ अब्ज डॉलर्स, जिंदाल परिवार ४३ नंबरवर असून त्यांची संपत्ती आहे ३.८ अब्ज डॉलर्स. मुंजाल परिवार ४६ वे स्थान, ३.२ अब्ज डॉलर्स व सिप्लाचे हमीद परिवार ५० वे स्थान २.९ अब्ज डॉलर्स.

Leave a Comment