सोशल मीडियावर अफवा पसरवल्यास मृत्युदंड

saudi
रियाद : सौदी अरेबियामध्ये सोशल मीडियावर पोस्ट करताना आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे. सौदीच्या सरकारने काढलेल्या नव्या आदेशानुसार एखाद्या आक्षेपार्ह पोस्टसाठी संबंधिताला मृत्यूदंडही दिला जाऊ शकतो. सोशल मीडियावर अफवा पसरवणा-याला इंटरनेट बॅनपासून मृत्युपर्यंतची शिक्षाही दिली जाऊ शकते. एका सरकारी वेबसाईटने या नव्या निर्णयाबाबत माहिती दिली आहे.

कायदे मंत्रालयानुसार मृत्यूदंडाबरोबरच आरोपींना चाबकाचे फटके, तुरुंगवास, प्रवासावर बंदी आणि सोशल मीडिया बॅन सारख्या शिक्षाही दिल्या जाऊ शकतात. आरोपीच्या शिक्षेबाबत वरिष्ठ न्यायाधीश निर्णय घेणार आहेत. एखाद्या आखाती देशाने ट्विटर-फेसबूकसारख्या सोशल मीडियाचा वापर करणा-यांसाठी अशा प्रकारचा इशारा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र कोणत्या प्रकारच्या पोस्टसाठी मृत्यूदंड दिला जाऊ शकतो हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. सौदीमध्ये याआधीच मास मीडिया सेंसरशिपसाठी अनेक कडक कायदे उपलब्ध आहेत. सौदीच्या बेसिक लॉ नुसार मुताबिक येथे देशातील सुरक्षेवर परिणाम करणा-या किंवा लोकांमध्ये दरी निर्माण करेल अशा बाबींना आधीच बंदी आहे.

Leave a Comment