फोक्सवॅगनने थांबवली पोलो कारची विक्री

plol
नवी दिल्ली- जर्मनची कार कंपनी ‘फोक्सवॅगन’ने आपली लोकप्रिय कार ‘पोलो’ची विक्री तातडीने थांबवण्याचा निर्णय घेतला असून कंपनीने या संदर्भात ११८ डीलर्सला पत्रही पाठवून याविषयी सूचना दिल्या आहेत. फक्त भारतीय बाजारात कारची विक्री काही काळासाठी थांबवल्याचे कंपनीच्या सूत्रांनी म्हटले आहे.

कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, पोलो कारमध्ये तांत्रिक त्रुटी राहिल्यामुळे कारची विक्री बंद करण्‍यात आली आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या इमिशन टेस्टिंग (प्रदूषण चाचणी) स्कॅंडलचा आणि कारची विक्री थांबवण्याचा काही एक संबंध नाही.

Leave a Comment