
मुंबई : महाराष्ट्र गुंतवणुकीच्या बाबतीत देशात सातव्या स्थानावर असल्याचे जागतिक बँकेच्या अहवालात नुकतच जाहीर करण्यात आले आहे. पण जून महिन्यानंतर हा सर्व्हे केला असता तर त्याची पिछाडी झाली नसती असा अजब दावा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी केला आहे.
उद्योगमंत्र्यांचा अजब दावा; जूनपूर्वीच्या सर्वेक्षणामुळे महाराष्ट्र पिछाडीवर
गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र जागतिक बँकेच्या अहवालानुसार सातव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. संबंधित सर्व्हे जून महिन्यापूर्वी करण्यात आला होता, पण जर जूननंतर हा सर्व्हे केला गेला असता तर महाराष्ट्र नक्कीच पहिल्या तीन राज्यांमध्ये असता, असा दावा मुंबईत आयोजित इंडस्ट्री समिटमध्ये देसाईंनी केला आहे.
राज्य सरकारने जूननंतर लायसन्स आणि इन्स्पेक्टरराज बंद केल्याने आपण हा दावा करत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
