जगातील सर्वात महाग टिव्ही: किंमत १५ कोटी

led
वॉशिंग्टन: आलिशान उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्टुअर्ट ह्युजेस या कंपनीने जगातील सर्वात महाग टिव्ही बाजारात आणला आहे. त्याची किंमत आहे तब्बल २.२६ मिलियन डॉलर्स; अर्थात सुमारे १५ कोटी रुपये!

‘प्रेस्टीज एचडी सुप्रीम रोज’ या टिव्हीचा स्क्रीन ५५ इंचाचा आहे. या टिव्हीच्या स्क्रीनच्या बाजूची फ्रेम आणि पाया चक्क सोन्याने बनविला आहे. त्यासाठी २८ किलो १८ कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय या फ्रेममध्ये १ कॅरेटचे ७२ हिरेही मढविण्यात आले आहेत.

ज्यांना या टिव्हीची किंमत जास्त वाटत असेल त्यांनीही नाराज होण्याची गरज नाही. कंपनीने टिव्हीचे स्वस्त मॉडेलही बाजारात आणले आहे. त्याची किंमत आहे १.५ अमेरिकन डॉलर्स. या मॉडेलमध्ये केवळ १९ किलो सोने आणि फक्त ४८ हिरे वापरण्यात आले आहेत.