यंदा दिवाळीत बँकातून सोने नाणी विक्री नाही

gold
दिवाळीत अनेक जण शुभ म्हणून सोन्याची नाणी खरेदी करतात. गेल्या वर्षी अनेक बँकांनी अशी गोल्ड काईन विक्रीसाठी उपलब्ध करून दिली होती आणि त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसादही मिळाला होता. यंदा मात्र रिझर्व्ह बँकेने गोल्ड काईन आयातीसंदर्भात बँकावर घातलेल्या निर्बंधांमुळे बँकांनी ही नाणी आयात न करण्यास पसंती दिली आहे. परिणामी यंदा बँकांतून ग्राहकांना सोने नाणी खरेदी करता येणार नाहीत तर त्यासाठी सराफ दुकानांतच जावे लागणार आहे.

एचडीएफसी, पंजाब बँक अशा अनेक बँकातून गतवषी नाणी विक्रीसाठी होती. बँक अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वीची शिल्लक नाणी यंदा विकली जातील . बँकेत मिळणारी नाणी वर्ल्ड गोल्ड कौन्सिल स्वित्झर्लंड यांच्याकडून प्रमाणित केलेली असतात त्यामुळे ती चोख असतात. यंदा मात्र आयातीवर निर्बंध असल्याने बँकांनी ही नाणी मागविलेलीच नाहीत. त्या ऐवजी सणासाठी गृहकर्ज, कार कर्ज, क्रेडीट कार्ड यासाठी अनेक ऑफर्स जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. सराफांकडे मात्र सोने नाणी उपलब्ध आहेत.

मेटल्स अॅन्ड मिनरल ट्रेडिंगने दिवाळीसाठी सोव्हेरिन गोल्ड काईन्स बाजारात आणली आहेत. त्यांच्या नेटवर्क स्टोअर्समध्ये ती विक्रीसाठी उपलब्ध असून त्यात नाण्याच्या एका बाजूवर अशोकचक्र तर दुसरीकडे म.गांधी यांची प्रतिमा आहे. ही नाणी ५ आणि १० ग्रॅम वजनात आहेत.
———

Leave a Comment