नासाने शेअर केले भारत-पाक सीमेचे अद्भूत छायाचित्र

nasa
नवी दिल्ली – नासा या अंतराळ संस्थेने भारत-पाकिस्तान सीमेचे अवकाशातून टिपलेले एक अद्भूत छायाचित्र शेअर केले असून रात्रीच्या काळोखात सीमारेषेवर सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आलेल्या दिव्यांमुळे भारत-पाक सीमारेषा या छायाचित्रात अगदी स्पष्ट उठून दिसते. नासाच्या एका अंतराळवीराने निकॉन डी४ डिजिटल कॅमेरातून २८ मिलिमीटर लेन्सच्या साहाय्याने हे छायाचित्र टीपले असून ते पाकमधील सिंधू नदीपात्रापासून उत्तर दिशेकडे पाहताना टिपण्यात आले आहे.

छायाचित्रात भारत-पाक सीमा रेषा केशरी रंगात अतिशय ठळकपणे आपल्याला पाहायला मिळते. तसेच पाकिस्तानातील कराची हे शहर या छायाचित्रात दिव्यांच्या प्रकाशामुळे उजळून निघालेले दिसते. सिंधू नदीपात्र आणि हिमालयाचाही भाग या छायाचित्रात नमूद करण्यात आला आहे.

Leave a Comment