लंडन : २५५ अब्ज डॉलर्स संपत्ती संयुक्त अरब अमिरातीत राहणा-या १२७५ अरबांकडे असल्याची माहिती वेल्थ-एक्स संस्थेने उघड केली आहे.
२५५ अब्ज डॉलर्सची १२७५ अरबांकडे संपत्ती
लंडन-संयुक्त अरब अमिरातीत राहणा-या १२७५ अरबांकडे २५५ अब्ज डॉलर्स संपत्ती आहे, अशी माहिती वेल्थ-एक्स संस्थेने उघड केली आहे. संयुक्त अरब अमिरातीत जगातील २० टक्के अतिश्रीमंत वर्ग राहतो. गेल्या वर्षभरात संयुक्त अरब अमिरातीत शेअर बाजार २० टक्क्याने घटला आहे. मात्र तरीही येथील श्रीमंतांच्या संपत्तीत भरच पडलेली आहे, अशी माहिती वेल्थ-एक्सचे संचालक डेव्हिड अवेट यांनी दिली. संयुक्त अरब अमिरातातील ५७ टक्के अरब हे उद्योगपती आहेत. तर ८ टक्के जणांना संपत्तीचा वारसा परंपरागत मिळालेला आहे. विशेष म्हणजे संयुक्त अरब अमिरातातील केवळ तीन टक्के जण तेल, गॅस, इंधनातून मिळणा-या उद्योगातून श्रीमंत बनले आहेत. या १२७५ अतिश्रीमंतांपैकी एक हजार जण अबू धाबी (४५०) व दुबई (४९५) येथे राहतात. तर मध्य पूर्वेत जवळपास ६ हजार अतिश्रीमंत राहतात. त्यांची एकूण संपत्ती ९९५ अब्ज डॉलर्स आहे. सौदी अरेबियात १४९५ अतिश्रीमंत राहतात.