मायक्रोसॉफटने मंगळवारी न्यूयार्क येथील इव्हेंटमध्ये अनेक प्रॉडक्ट लाँच केले आहेत. त्यातच त्यांचे सरफेस बुकही सामील आहे. सरफेस बुक नावाचे हे नवे आणि हायटेक डिव्हाईस पूर्वीच सरफेसपेक्षा अधिक पॉवरफुल आहे असे समजते.
मायक्रोसॉफ्टचे १ टीबी स्टोरेजचे सरफेस बुक सादर
या सरफेससाठी १३.५ इंची डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह दिला गेला आहे. १६ जीबी रॅम, १ टीबी स्टोरेज, सिक्स्थ जनरेशन प्रोसेसर अशी त्याची अन्य फिचर्स असून त्याची किंमत आहे १४९९ डॉलर्स म्हणजे साधारण ९७,७८७ रूपये. त्यासाठीचे प्रीबुकींग सुरू झाले असून सरफेस २६ आक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जात आहे.
हाय टेक फिचर्समध्ये गोरिल्ला ग्लास, कीबोर्ड मध्ये माऊसपॅडवर फिंगरप्रिंट सेन्सर, ग्राफिक्ससाठी एनव्हीआयडीईए जीईफोर्स जीपीयू, २ यूएसबी पोर्ट, दोन फोर के डिस्प्ले पोर्ट, इथरनेट, फूलसाईज एसडी कार्ड पोर्ट, इंटिग्रेटेड बॅकलाईट की बोर्ड अशी फिचर्स आहेत. सरफेसची बॉडी मॅग्नेशियमची आहे आणि बॅटरीचा बॅकअप १२ तासांचा आहे. ८.४ मिमी जाडीचा हा सरफेस मायक्रो पेन आणि टच चिपसेटसह आहे.