गेम खेळून पैसे कमाईची संधी देणारे अॅप

yepaisa
गुगलच्या अँड्राईड बेसवर एक अॅप, ये पैसा डॉट कॉमने सादर केले आहे. यातून खेळाची मजा लुटतानाच पैसे कमाईची संधीही युजरला मिळणार आहे. यात अनेक रिवॉर्ड पॉईंटसह फ्री मोबाईल रिचार्ज, चित्रपट तिकीटे, पिझ्झा, कॉफीची मजाही युजर लुटू शकणार आहेत.

या अॅपवर सुडोकू, क्रॉसवर्ड, नटहंट, फरू, बॉल इन द होल, पॅरा जंप, घोस्ट स्मॅशर असे अनेक बहारदार आणि मनोरंजक खेळ आहेत. ये पैसा डॉट कॉमकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांची यामागची कल्पना युजरचा वेळ वाया जाऊ नये अशी आहे. म्हणजे युजर त्याचा वेळ खर्च करणार असेल तर त्यासाठी त्याला बक्षीसही मिळाले पाहिजे म्हणजे हा वेळ सार्थकी लागेल आणि वाया जाणार नाही. युजरला वाटले तर तो रिवॉर्ड पॉईंटच्या माध्यमातून मिळालेला पैसा दानही करू शकणार आहे. त्यासाठी ये पैसाने अनेक स्वयंसेवी संस्था, क्राय या संस्थेशी सहकार्य करार केला आहे. युजर त्याला मिळालेला पैसा या संस्थांसाठी देऊ शकतो. या दानाबदली या संस्था युजरला रिवॉर्ड पॉईंट देतील.