वन प्लसचा बजेट फोन लवकरच येणार

oneplus
चीनी स्मार्टफोन कंपनी वनप्लस ने त्यांच्या फ्लॅगशीप वन प्लस फोन मालिकेतील वन प्लस टूचा बजेट फोन वन प्लस एक्स नावाने बाजारात लवकरच आणला जात असल्याचे संकेत दिले आहेत.अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वन प्लस एक्स आक्टोबरमध्येच बाजारात दाखल होत आहे.

या फोनसाठी ५ इंचाचा डिस्प्ले, लेदर बॅक, ड्यूअल कॅमेरा लेन्स, फिंगरप्रिंट सेन्सर ही फिचर्स असतील. वन प्लसचे सहसंस्थापक कार्ल पेई यांनी दिलेल्या संकेतानुसार हा फोन स्पेसिफिकेशनपेक्षा डिझाईनला अधिक पसंती देणार्‍या ग्राहकांना भुरळ घालेल. वन प्लस टूपेक्षाही याचे डिझाईन अधिक चांगले केले गेले आहे. हा फोन साधारण १५ ते २० हजार रूपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध होईल अँड्राईड बेसवर आधारित हा फोन २४९ डॉलर्समध्ये उपलब्ध करून दिला जाईल असे एका मोबाईल स्पेशल मासिकात नमूद केले गेले आहे.

Leave a Comment