भारत हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय : मोदी

modi
बंगळुरू: जगाला व्यापणाऱ्या मंदीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीसाठी भारत हा सर्वोत्तम पर्याय आहे; असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

नास्कोमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंडो जर्मन संमेलनात ते बोलत होते. यावेळी जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल या देखील उपस्थित होत्या.

आपल्या सरकारने सत्ता प्राप्त केल्यानंतर १५ महिन्यात भारताला व्यवसाय करण्यासाठी अनुकूल बनविल्याचा दावा करून मोदी म्हणाले की; सरकारने गुंतवणूकदारांच्या समस्या दूर करण्यासाठी अनेक्क महात्वाचेनिर्णय घेतले आहेत.

महात्वाकांक्षी ‘डिजीटल इंडिया’ प्रकल्पावर भर देत मोदी म्हणाले की; भारताचे सॉफ्टवेअर जगाचे हार्डवेअर चालवेल.

जर्मनीची अभियांत्रिकी आणि भारताची माहिती तंत्रज्ञानातील कौशल्य यांचा बंगळुरू येथे संगम झाल्याचे मार्केल यांनी नमूद केले.
या संमेलनाला उपस्थित रहाण्यापूर्वी मोदी आणि मार्केल यांनी ‘बोश’ या वाहनाचे सुटे भाग बनविणाऱ्या जर्मन कंपनीच्या बंगळुरू येथील उत्पादन प्रकल्पाला भेट दिली. यावेळी मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ आणि डिजीटल इंडियाला गती देण्याच्या दृष्टीने बोशच्या अधिकाऱ्यांशी संशोधन आणि विकास या विषयावर सविस्तर चर्चा केली.

Leave a Comment